महा कॅम्पा निधीतून व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाची कामे पूर्ण करा
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरणाची
(महा कॅम्पा) बैठक
मुंबई, दि. २६ : वनसंवर्धन राखीव क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून त्यांच्या जीवनात आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी कॅम्पा अंतर्गत असलेल्या निधीचा मोठा हातभार लागू शकतो. या निधीच्या उपयोगातून व्याघ्र प्रकल्प आणि इतर संरक्षित क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनाची कामे पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
तसेच या निधीतून पूर्ण केलेल्या वनीकरण, मृद व जलसंधारणाच्या कामांची उपग्रह व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पडताळणी करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आज दिल्या.
सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरणाची (महा कॅम्पा) बैठक झाली. यावेळी आढावा घेताना मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीला दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे वनमंत्री गणेश नाईक उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, कॅम्पाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची सध्याची पडताळणीची पद्धत बदलून कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्यात यावी. पूर्ण झालेल्या वनीकरणाच्या कामांपैकी काही नमुने निवडून त्यांचे सर्वेक्षण करावे. संबंधित यंत्रणांनी मृद व जलसंधारण तसेच वनीकरण कामांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही कामे पूर्ण करावीत.
No comments:
Post a Comment