गुणवत्तापूर्ण औषधांसाठी आरोग्य विभागाचे ड्र्ग डिटेक्शन मशीन
-आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
- २ मिनिटात तपासणार औषधाची गुणवता; ८ विभागात कार्यान्वित
मुंबई, दि. २६ : नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देताना डॉक्टरांची उपलब्धता, पायाभूत सुविधा आणि औषधांचा पुरवठा यांच्याइतकेच औषधांचे गुणवत्ता नियंत्रण महत्वाचे आहे. नागरिकांना शासकीय आरोग्य संस्थांमधून गुणवत्तापूर्ण औषधांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील आठ विभागांत आधुनिक औषध शोध यंत्र (ड्र्ग डिटेक्शन मशीन) कार्यान्वित केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाला पुरवठा होत असलेली औषधे गुणवत्तापूर्ण असावीत यासाठी पहिल्यांदाच ड्र्ग डिटेक्शन यंत्रणा वापरण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या यंत्रणेच्या माध्यमातून औषधांच्या नमुन्यांची प्राथमिक तपासणी करून संशयित अथवा गुणवत्तेबाबत त्रुटी आढळणारे नमुने पुढील प्रयोगशाळीय पडताळणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. औषध खरेदी आणि पुरवठा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नियमित देखरेख निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार असल्याचे मंत्री आबिटकर म्हणाले.
No comments:
Post a Comment