जैन समाजाने सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत सहभाग वाढवावा
-मंत्री मंगलप्रभात लोढा
यावेळी कौशल्य विकास इतर खात्यांचा उल्लेख करावा मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, येथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती स्वतःमध्ये एक संस्था असून जैन समाजातील अनेक व्यक्ती विविध क्षेत्रांत सेवा कार्य करीत आहेत. मात्र, आता जैन समाजाने एखादा सामाजिक उपक्रम सामूहिकपणे स्वीकारण्याच्या दिशेने पुढे जाण्याची गरज आहे. आयुष्मान भारत योजना, तलाव स्वच्छता किंवा केंद्र व राज्य शासन तसेच महानगरपालिकेच्या एखाद्या योजनेच्या अंमलबजावणीत संपूर्ण जैन समाजाने सहभाग घेतल्यास शासन आणि समाज यांच्यातील समन्वय अधिक दृढ होईल.
दुष्काळाच्या परिस्थितीतही जैन समाजाने सेवाभावाने पुढे यावे, असे आवाहन करून मंत्री लोढा म्हणाले की, अनेक ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची, शेतीला पाण्याची तसेच पशुधनाला चारा आणि पाण्याची आवश्यकता आहे. भगवान महावीरांच्या अहिंसेचा संदेश मानणाऱ्या समाजाने अशा संकटकाळात शासनासोबत काम करून सेवाभाव पुढे न्यावा
No comments:
Post a Comment