Monday, 19 October 2026

महाराष्ट्रात वाढवण बंदर, मरीन क्लस्टर, दिघी पोर्ट यांसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून बंदर आणि सागरी क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना

  मंत्री नितेश राणे म्हणाले की, महाराष्ट्रात वाढवण बंदर, मरीन क्लस्टर, दिघी पोर्ट यांसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून बंदर आणि सागरी क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पांना आवश्यक असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ महाराष्ट्रातील तरुणांमधूनच उपलब्ध व्हावे, यासाठी कृष्णापटणम येथील प्रशिक्षण केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे.

या प्रशिक्षण केंद्रांसाठी आवश्यक जागा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. महाराष्ट्रात अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला अदानी स्किल सेंटरच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांना आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योगाभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार असून, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यासोबतच बंदर आणि सागरी क्षेत्राला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ राज्यातच तयार होईल. विशेषतः कोकणासह राज्यातील किनारपट्टी भागातील तरुणांना स्थानिक पातळीवर कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देत सागरी आणि बंदर क्षेत्रात उत्तम करिअर घडविण्याचा मार्ग खुला होईल, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला.


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi