Saturday, 10 October 2026

राज्यात मानसिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करणार,टेली-मानस हेल्पलाइनला,स्मृतीदोष क्लिनिकमधून नागरिकांना लाभ

 राज्यात मानसिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करणार

– आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर


· टेली-मानस हेल्पलाइनला ३ लाख २७ हजारांहून अधिक कॉल्स

· स्मृतीदोष क्लिनिकमधून दरवर्षी ४५ हजारांहून अधिक नागरिकांना लाभ


            मुंबई, दि. ९ : मानसिक आरोग्याविषयी जनजागृती, समुपदेशन आणि उपचार सेवा अधिक सुलभ करण्यासाठी राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. टेली-मानस हेल्पलाइन, मनशक्ती क्लिनिक, स्मृतीदोष क्लिनिक आणि मनोसामाजिक पुनर्वसन सेवांच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सेवांचे जाळे बळकट करण्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाचा भर आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून नागरिकांना वेळेत मदत मिळावी, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.


            जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त (१० ऑक्टोबर) राज्यात ‘मनजागृती’ आणि ‘मनसंवाद’ या संदेशांतून मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. यंदाची जागतिक संकल्पना प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्तींचे म्हणणे ऐकून त्यातून सकारात्मक बदल घडविण्याची आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करणाऱ्या व्यक्तींना केवळ ऐकून घेणे पुरेसे नसून, त्यांच्या अनुभवांना सेवा आणि निर्णयप्रक्रियेत स्थान मिळणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi