मुंबईचा विकास होत असताना मुंबईला नशेपासून सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ‘ड्रग्स फ्री भारत’चा संकल्प व्यक्त केला आहे. युवकांच्या शक्तीवरच विकसित भारताची उभारणी होणार आहे. त्यामुळे युवकांनी नशेपासून दूर राहावे आणि ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाला प्रत्येकाने हातभार लावावा, असे आवाहन मंगलप्रभात लोढा यांनी केले.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सहायक प्राध्यापक डॉ. साईगीता चित्तूरू यांनी ‘किशोरावस्था’ या विषयाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ब्रम्हकुमारी प्रशांती यांनी ‘Be Smart Be Strong Within’ याविषयावर मुलांना मार्गदर्शन केले. तसेच डिवाईन टच संस्थेच्या प्रतिनिधींनी चांगल्या गोष्टींची योग्य ‘निवड’ कशी करावी, याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment