किमान २० टन क्षमतेचे प्रकल्प
सीबीजी प्रकल्पांची किमान क्षमता प्रतिदिन २० टन असेल. ग्रीनफिल्ड व ब्राऊनफिल्ड प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी किंवा हायब्रिड ॲन्युइटी मॉडेलद्वारे उभारता येतील. लहान शहरांसाठी समूहाधारित प्रकल्पांनाही प्रोत्साहन मिळेल. प्रकल्पाच्या प्रतिदिन प्रतिटन क्षमतेमागे एक एकर या प्रमाणात किमान एक व कमाल २० एकर जमीन देता येईल. जमिनीच्या रेडी रेकनर दराच्या ०.७ टक्के दराने भाडेपट्टा आकारला जाईल आणि दर तीन वर्षांनी त्यात पाच टक्के वाढ होईल. प्रकल्प सुरू झाल्यानंतर २.५ टक्के राज्य जीएसटी परतावा, टिपिंग शुल्क तसेच पाणी व वीज सुविधा देण्याची तरतूद असल्याचेही जेवळीकर यांनी सांगितले.
शेतकरी उत्पादक संस्था आणि महिला स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातू
No comments:
Post a Comment