Wednesday, 28 October 2026

आदिवासी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक कार्यवाहीश्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक

 आदिवासी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक कार्यवाही

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक

 

मुंबई, दि. २७ : आदिवासी समाजाचे शिक्षण, वनहक्क, पुनर्वसन, पाणीपुरवठा, आधार नोंदणी आणि कामगार कल्याणाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी  शासन सकारात्मक कार्यवाही करीत आहे. संबंधित विभागांनी समन्वयाने प्रस्ताव व कालबद्ध कृती आराखडे तयार करून कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विकसित भारत २०४७ व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याच्या प्रक्रियेत श्रमजीवी संघटना आणि समर्थन संस्थेला सहभागी करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.  आदिवासी समाजाच्या विकासाचा स्वतंत्र आराखडा तयार करताना विविध संघटनाच्या सूचनांचा समावेश करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi