चला शाळेत जाऊया’ अभियानाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद;
शैक्षणिक गुणवत्ता व पायाभूत सुविधांचा आढावा
· शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची कोकणातील शाळांना भेट
मुंबई, दि. १० : राज्यातील शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, अध्यापन-अध्ययन प्रक्रिया तसेच विविध शासकीय शैक्षणिक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘चला शाळेत जाऊया’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मंत्री, वरिष्ठ अधिकारी, पालक अधिकारी आणि जिल्हा नोडल अधिकारी यांच्या प्रत्यक्ष शाळा भेटींमुळे शालेय प्रशासनातील सकारात्मक बाबी, अडचणी आणि आवश्यक सुधारणांच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होत आहे.
No comments:
Post a Comment