Saturday, 10 October 2026

नोटीस प्राप्त मतदारांनी कागदपत्रे सादर करावीत

 नोटीस प्राप्त मतदारांनी कागदपत्रे सादर करावीत

मागील विशेष सखोल पुनरीक्षणातील नोंदींशी जुळवणी न झाल्यामुळे (नो मॅपिंग) किंवा जुळवणी होऊनही तार्किक विसंगती (लॉजिकल डिस्क्रिपन्सी) आढळल्यामुळे नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनाही विशेष शिबिरांमध्ये संबंधित कागदपत्रे सादर करता येतील.

 

            भारत निवडणूक आयोगाने नोटिशीत नमूद केलेल्या १३ प्रकारच्या कागदपत्रांपैकी आवश्यक कागदपत्र उपलब्ध नसल्यास अन्य वैध कागदपत्रे किंवा दस्तऐवज सादर करता येतील. यासाठी ‘एनी अदर डॉक्यूमेंट्स’ हा पर्याय बीएलओ ॲपवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

            मतदारांनी १२ ऑक्टोबरची अंतिम मुदत लक्षात घेऊन आवश्यक अर्ज व कागदपत्रे वेळेत सादर करावीत आणि विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi