Saturday, 10 October 2026

आंध्र प्रदेशच्या आधुनिक मत्स्य प्रयोगांचा महाराष्ट्रात प्रभावी वापर करणार

 आंध्र प्रदेशच्या आधुनिक मत्स्य प्रयोगांचा महाराष्ट्रात प्रभावी वापर करणार

–मत्सव्यवसाय मंत्री नितेश राणे

  • तंत्रज्ञानाधारित, शाश्वत आणि जागतिक स्पर्धाक्षम मत्स्य परिसंस्थेवर भर
  • दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यात मत्स्यव्यवसाय व ॲक्वाकल्चर विकास मॉडेलचा आढावा

 

            मुंबई, दि. ९ : मत्स्य उत्पादनापासून प्रक्रिया, बाजारपेठ आणि निर्यातीपर्यंत प्रत्येक टप्प्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी आंध्र प्रदेशातील उपयुक्त प्रयोगांचा महाराष्ट्रात प्रभावी वापर केला जाणार आहे. त्यातून मच्छीमार व मत्स्य शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून राज्यात सक्षम, शाश्वत आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक मत्स्य परिसंस्था उभारण्यावर भर दिला जाईल, असे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

 

            आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यात मंत्री राणे यांनी तेथील मत्स्य आयुक्तालयाच्या मुख्यालयास भेट देऊन मत्स्यव्यवसाय व ॲक्वाकल्चर क्षेत्राच्या विकास मॉडेलची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादकता वाढ, मच्छीमार कल्याण आणि एकात्मिक मत्स्य मूल्यसाखळीचा आढावा घेतला.

 

            मत्स्य आयुक्तालयातील बैठकीत मत्सव्यवसाय मंत्री राणे यांनी सागरी व अंतर्देशीय मत्स्यव्यवसायासह ॲक्वाकल्चर क्षेत्राची उत्पादकता वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना जाणून घेतल्या. यामध्ये एआय-आधारित ‘Aquaculture 4.0’, मत्स्य आरोग्य व रोग निरीक्षण, पाण्याच्या गुणवत्तेचे रिअल-टाइम परीक्षण, स्मार्ट फीडिंग, माशांच्या वर्तनाचे विश्लेषण,आरएएस व बायोफ्लॉक, आयओटी, आधारित ॲक्वाकल्चर, डिजिटल ट्रेसेबिलिटी, तलाव नोंदणी, प्रजाती विविधीकरण, बोटींचे ट्रॅकिंग आणि मासेमारीतील पकड निरीक्षण यांचा समावेश होता.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi