Saturday, 10 October 2026

वारीच्या गौरवशाली परंपरेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान

 वारीच्या गौरवशाली परंपरेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            यासंदर्भात प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंढरपूर वारी ही भक्तीमार्गातील अतिशय प्राचीन परंपरा असून ती जात, धर्म, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न करता सर्वांना विठुरायाच्या रंगात रंगवून एकत्र आणते. ही महान परंपरा, तिचे उद्दिष्ट आणि विचार जगभरात पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत ‘पंढरपूर वारी - इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ ही सुंदर डॉक्युमेंट्री तयार करून रिलीज करण्यात आली आहे. या डॉक्युमेंट्रीला ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026 मध्ये भारत देशासाठीचा ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासाठी माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांचे मी अभिनंदन करतो. वारीची गौरवशाली परंपरा जगासमोर मांडणारी माहितीपट सर्वांनी पाहावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi