. बी.-जी. राम जी’ अंतर्गत मागेल त्याला काम देण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा
– रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले
· दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रोजगार हमी, विकसित भारत-रोजगार आणि आजिविका हमी मिशनच्या कामांचा राज्यस्तरीय आढावा
· दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश
· जलसंधारणाच्या कामांसह रोजगार निर्मिती व मजुरांचे स्थलांतर रोखण्याला प्राधान्य
मुंबई, दि. 5 : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रोजगार हमी योजना विभागासह संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. ‘व्ही. बी.-जी. राम जी’ अंतर्गत मागेल त्याला तातडीने काम उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा ते ग्रामपंचायत स्तरापर्यंत युद्धपातळीवर कार्यवाही करावी. दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करून रोजगार निर्मिती, जलसंधारण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिले.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रोजगार हमी, विकसित भारत-रोजगार आणि आजीविका हमी मिशनच्या कामांचा राज्यस्तरीय आढावा दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे घेण्यात आला. यावेळी रोजगार हमी योजना विभागाचे सचिव आप्पासो धुळाज, सह सचिव अतुल कोदे तसेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
No comments:
Post a Comment