Saturday, 26 September 2026

गणरायावर मान्यवरांकडून पुष्पवृष्टी; ‘कुबुद्धीचे विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो

 गणरायावर मान्यवरांकडून पुष्पवृष्टी; ‘कुबुद्धीचे विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो’

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २५ : गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायावर पुष्पवृष्टी केली. भक्तिभावाने श्री गणेशाला निरोप देताना, कुबुद्धीचे विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी गणरायाला केली.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. विशेषतः मुंबई आणि पुणे शहरात पोलीस प्रशासन तसेच महानगरपालिकांनी अतिशय चांगली व्यवस्था केली आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुका सुरळीत आणि शांततेत पार पडत आहेत. देशातील तसेच जगातील चांगल्या आणि सक्षम पोलीस दलांपैकी महाराष्ट्र पोलीस दल आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘कुबुद्धीचे विसर्जन करा आणि सगळ्यांनाच सुबुद्धी येवो,’ अशी प्रार्थनाही त्यांनी  केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi