महाराष्ट्र स्टार्टअपचे प्रेरक स्थान
महाराष्ट्रातील ८७ विद्यापीठे, सुमारे पाच हजार ५०० महाविद्यालये आणि ४५ लाखांहून अधिक विद्यार्थी उद्याचा महाराष्ट्र घडविण्याची क्षमता बाळगतात. नव्या कल्पना घेऊन पुढे येणाऱ्या युवकांना शासन सातत्याने प्रोत्साहन देईल. २०१५ पासून मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रमाच्या सात तुकड्यांतील विविध क्षेत्रांतील युवा व्यावसायिकांना वरिष्ठ प्रशासनासोबत थेट काम करण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्राने २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर आणि २०३५ पर्यंत दोन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवोन्मेष ही प्रमुख प्रेरक शक्ती ठरणार आहे. जगासाठी महाराष्ट्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती आणि संरचना करण्याचे राज्याचे ध्येय असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment