Tuesday, 29 September 2026

मंत्रालयातील खादी व ग्रामोद्योग उत्पादनांच्या प्रदर्शनाला

 मंत्रालयातील खादी व ग्रामोद्योग उत्पादनांच्या प्रदर्शनाला

उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांची भेट

  • उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी घेतली उत्पादनांची माहिती

 

मुंबई, दि. २९ : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांच्या वतीने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या खादी व ग्रामोद्योग उत्पादनांच्या प्रदर्शनास उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी भेट दिली.

यावेळी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत, सहमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील, सहायक योगेश पवार आणि आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी खादी व ग्रामोद्योग उत्पादनांच्या प्रदर्शनात उभारण्यात आलेल्या प्रत्येक स्टॉलला भेट देऊन उत्पादनांची माहिती घेतली.

या प्रदर्शनात मध संचालनालय, क्राफ्टी आर्च, माई महिला बचतगट, ब्युटी क्वीन बीज – गिफ्टेक्स इंडस्ट्रीज, जीन क्रिएशन, सई लेदर वर्क्स शॉप, कोल्हापूर, औद्योगिक व्यवसाय संस्था, मुंबई, कस्तुरबा सोलर खादी समिती, अमरावती, नागपुरे ड्रायफूड्स, जागृती हळद पावडर, फ्लोरिया नॅचरल्स, ग्लॅमरएक्स इम्पेक्स, निद्रा क्रिएशन, ठाणे आणि मॉर्डन लेदर आर्ट, माथेरान आदी संस्थांच्या उत्पादनांचा समावेश आहे.

प्रदर्शनात मध संचालनालयाचे ‘मधुबन मध’, खादी वस्त्रे, घरगुती पापड, लोणची, सौंदर्य प्रसाधने, हळद, विविध ड्रायफूडस, कोल्हापुरी चप्पल यांसह विविध खादी व ग्रामोद्योग उत्पादनांची खरेदी करता येणार आहे. महिला बचतगट तसेच ग्रामीण भागातील उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांनाही या प्रदर्शनातून बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात हे प्रदर्शन  १ ऑक्टोबर २०२६  पर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi