डेटावर आधारित निर्णयांसाठी एकात्मिक डॅशबोर्ड
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांसाठी सध्या ४० हून अधिक स्वतंत्र पोर्टल कार्यरत आहेत. या पोर्टलवरील महत्त्वाची माहिती एकत्रित करून एकाच व्यासपीठावर उपलब्ध करण्यासाठी एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड विकसित करण्यात आला आहे. माता व बाल आरोग्य, क्षयरोग नियंत्रण, असंसर्गजन्य आजारांची तपासणी आदी कार्यक्रमांशी संबंधित प्रमुख निर्देशांकांचे राज्य तसेच जिल्हानिहाय विश्लेषण या डॅशबोर्डवर करता येणार आहे. यामुळे आरोग्यविषयक आव्हाने तातडीने ओळखणे, जिल्हानिहाय कामगिरीचे मूल्यमापन करणे आणि आवश्यक ठिकाणी परिणामकारक उपाययोजना करणे अधिक सुलभ होणार आहे. आरोग्यविषयक माहितीचे रूपांतर कृतीयोग्य डेटामध्ये होऊन प्रशासकीय निर्णय अधिक अचूक आणि गतिमान होणार आहेत.
No comments:
Post a Comment