Monday, 28 September 2026

बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी उपयुक्त जोडधंदा -मंत्री भरत गोगावले

 बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी उपयुक्त जोडधंदा -मंत्री भरत गोगावले

बांबू लागवडीला चालना देऊन शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जनजागृती तसेच बांबू आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.

महाराष्ट्रात बांबू लागवडीसाठी शासनाकडून आर्थिक मदत दिली जात असून, लागवडीनंतर तीन वर्षांच्या देखभालीसाठीही सहकार्य केले जाते. बांबूपासून विविध वस्तू व उद्योग उभारण्याची मोठी क्षमता असून, या क्षेत्रासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य शासनाच्या माध्यमातून केले जाईल. शेतीसोबत बांबूची लागवड हा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त जोडधंदा ठरू शकतो, असे मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi