Wednesday, 9 September 2026

शिवनेरीच्या बफर झोनमधील अनधिकृत बांधकामांवर सात दिवसांत कार्यवाही करा

 शिवनेरीच्या बफर झोनमधील अनधिकृत बांधकामांवर सात दिवसांत कार्यवाही करा

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

 

  • नेत्रमॲपच्या माध्यमातून संरचनांच्या कालावधीची तपासणी करण्याचे निर्देश

 

मुंबई, दि. ८ : छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक व जागतिक वारसा मूल्य लक्षात घेता किल्ला परिसरातील अनधिकृत बांधकामे, अन्य संरचनांबाबत तातडीने वस्तुनिष्ठ तपासणी करून कार्यवाही करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

 

शिवनेरी किल्ला व परिसरातील स्थितीबाबत सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे (एएसआय) अधिकारी, पुरातत्त्व विभाग, तहसीलदार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांची आढावा बैठक झाली.

 

शिवनेरी किल्ला हा जागतिक वारशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून, संबंधित वारसा वास्तूच्या संरक्षित व बफर झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम अथवा संरचना उभारली जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी दिले.

 

किल्ला परिसरातील संरचना नेमक्या कोणत्या कालखंडात निर्माण झाल्या, त्याबाबत महसूल अभिलेख, उपलब्ध ऐतिहासिक दस्तऐवज तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या संरचना पूर्वीपासून अस्तित्वात होत्या की अलीकडच्या काळात निर्माण करण्यात आल्या, याची निश्चित पडताळणी करण्याचे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.

 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi