आरोग्य यंत्रणेतील तळागाळातील घटकांना सक्रिय करण्यासाठी जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील कार्यरत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचाऱ्यांसाठी विशेष व्याख्याने आयोजित करून त्यांच्याकडून अवयवदानाचे अर्ज भरून घेण्यात आले. युवा पिढीमध्ये याचे महत्व रुजवण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये अवयवदान प्रबोधन फेरी, चित्रकला आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय, शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये प्रबोधनपर फलक व भित्तिपत्रके लावण्यात आली, तर दरवर्षीप्रमाणे अवयवदान करणाऱ्या दात्यांच्या कुटुंबांचा विशेष सन्मान करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
शासकीय पातळीवर अवयवदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी पथनाट्ये, चित्रपटगृहांमधील जाहिराती, आकाशवाणीवरील संदेश, परिसंवाद आणि लघुपट प्रदर्शनाद्वारे 'महाअवयवदान महोत्सव' यशस्वीरीत्या राबवण्यात आला. या सर्वसमावेशक प्रयत्नांमुळे राज्यातील अवयवदानाविषयीच्या अंधश्रद्धा दूर होऊन एका नव्या सामाजिक क्रांतीची सुरुवात झाल्याची माहितीही मंत्री आबिटकर यांनी दिली
No comments:
Post a Comment