Tuesday, 15 September 2026

सामुदायिक पदयात्रा केवळ प्रतीकात्मक कार्यक्रम नसून

 टीबीबाबत समाजात आजही अनेक गैरसमज आणि अनावश्यक भीती आहे. सामाजिक कलंकाच्या भीतीमुळे अनेक जण वेळेवर तपासणी करून घेत नाहीत किंवा उपचार मध्येच थांबवतात. यामुळे रुग्णाचे आरोग्य धोक्यात येण्याबरोबरच संसर्ग इतर व्यक्तींपर्यंत पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे टीबीच्या रुग्णांशी भेदभाव न करता त्यांना सहानुभूती, सहकार्य आणि सन्मानाची वागणूक देणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

मुंबईच्या मोठ्या लोकसंख्येचा विचार करता झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये विशेष जनजागृती करणे आवश्यक आहे. वेळेवर मिळणारी योग्य माहिती, निदान आणि उपचार हे टीबीचा प्रसार रोखण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

 

ही सामुदायिक पदयात्रा केवळ प्रतीकात्मक कार्यक्रम नसून   समाजामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे. नागरिक स्वतः पुढाकार घेऊन जनजागृतीमध्ये सहभागी झाले, तर त्याचे रूपांतर व्यापक लोकचळवळीत होऊ शकते. या पदयात्रेच्या माध्यमातून हजारो कुटुंबांपर्यंत टीबीला घाबरू नका, वेळेवर तपासणी करा आणि पूर्ण उपचार घ्याहा संदेश पोहोचेल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi