शिबिरात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी
या शिबिरात विविध वैद्यकीय विभागांमार्फत पत्रकारांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी करण्यात आली. न्यूरोलॉजिस्ट तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गीते, जे.जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, पुणे बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार,ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्यासाहेब लहाने,पोटविकार तज्ज्ञ डॉ. अमित मायदेव, लठ्ठपणा निवारण तज्ज्ञ डॉ. जयश्री तोडकर, यकृत प्रत्यारोपण व पोटविकार तज्ज्ञ डॉ. विभा वर्मा हृदयरोगतज्ज्ञ डॉ. कल्याण मुंडे, जनरल मेडिसिन डॉ. मधुकर गायकवाड, यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी पत्रकारांशी संवाद साधत आरोग्यविषयक तपासणी करीत मार्गदर्शन केले.
शिबिरामध्ये प्राथमिक तपासणी, नेत्ररोग, त्वचारोग, हृदयरोग, स्त्रीरोग, फिजिओथेरपी, जनरल मेडिसिन, अस्थिरोग, कर्करोग, रक्त तपासणी, श्वसनविकार, पोट व पचनसंस्थेचे विकार, कान-नाक-घसा, मानसिक आरोग्य, औषध वितरण, वजन नियंत्रण, आयव्हीएफ व वंध्यत्व उपचार, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग तपासणी आदी विविध वैद्यकीय विभागांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच दंतचिकित्सा, कर्करोग व नेत्ररोग तपासणीसाठीही स्वतंत्र सुविधा ठेवण्यात आली होती.
विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी शिबिरातील विविध विभागांना भेट देऊन डॉक्टर, वैद्यकीय पथक आणि पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आरोग्य सुविधांची त्यांनी पाहणी केली.
शिबिरामध्ये जे.जे. रुग्णालय, जी. टी. रूग्णालय, सेंट जॉर्ज, कामा रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय, आर. ए. पोदार, के. जी. मित्तल, मुंबादेवी रूग्णालय, कुपर रुग्णालय, नायर, बॉम्बे हॉस्पिटल, हिंदूजा हॉस्पिटल, रिलाईन्स रुग्णालय आणि सेफी रुग्णालयासह मनपा रूग्णालयातील विविध आजारांचे सुमारे ६०० तज्ज्ञ डॉक्टर आणि इतर सहायक सहभागी झाले होते. सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत सुमारे ८९२ पत्रकार आणि इतरांची तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले. शिवाय काही पत्रकारांना शासकीय रूग्णालयात संदर्भित करण्यात आले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब, टेलिव्हीजन जर्नालिस्ट असोसिएशन (टिव्हीजेए, मुंबई हिंदी पत्रकार संघ, मुंबई क्राईम रिपोर्टस असोसिएशन, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, बॉम्बे न्युज फोटोग्राफर असोसिएशन, बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ, व्हॉइस ऑफ मिडिया, पत्रकार विकास संघांचे पदाधिकारी उपस्थित होते
No comments:
Post a Comment