Tuesday, 15 September 2026

पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

 पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे मिसिंग लिंक टनेल आणि ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदराचा उल्लेख करत, महाराष्ट्र हे देशाचे 'ग्रोथ इंजिन' 'पावर हाऊस' बनले असून राज्य १.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

समृद्धी महामार्गाचा अनुभव सांगताना त्यांनी विकास प्रकल्पांसाठी सरकार आणि जनतेमधील विश्वास किती महत्त्वाचा आहे, यावर भर दिला. समृद्धी महामार्गासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला देताना आपल्या उपस्थितीत करार करण्यात आले आणि त्यानंतर काही तासांतच आरटीजीएसद्वारे त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, असा अनुभव त्यांनी सांगितला. या विश्वासामुळे जमीन संपादनाची प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण होण्यास मदत झाली, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi