Saturday, 26 September 2026

बाजारपेठेचा अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जावर पुनर्विकास

 शेतकरी, माथाडी कामगार आणि व्यापारी हे कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेचे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत. शेतकरी माल पिकवतो, परंतु तो ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या विपणन साखळीत माथाडींचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. 50 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या वाशी मार्केटच्या इमारती आता जीर्ण झाल्या असून, बदलत्या जागतिक व्यापाराची गरज ओळखून या संपूर्ण बाजारपेठेचा अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जावर पुनर्विकास केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण कितीही आले तरी माथाडी कामगारांचे काम आणि महत्त्व अबाधित राहील, असे स्पष्ट करत 50 किलो वजनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शासन कडक कारवाई करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi