Wednesday, 23 September 2026

गणेश मंडप बनले लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचे व्यासपीठ ‘लोकसंवाद 2026’च्या माध्यमातून नागरिकांना योजनांची माहिती, पात्रता व अर्ज प्रक्रियेबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन

 गणेश मंडप बनले लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचे व्यासपीठ

‘लोकसंवाद 2026’च्या माध्यमातून नागरिकांना योजनांची माहिती,

पात्रता व अर्ज प्रक्रियेबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन

            मुंबई, दि. 23 : गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्ती, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचा सुंदर संगम साधत माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद 2026’ या अभिनव उपक्रमाला मुंबई उपनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गणेश मंडळांना भेट देण्यासाठी परिसरातील नागरिकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन गणेश मंडपांचे रूपांतर लोककल्याणकारी योजनांच्या माहितीच्या व्यासपीठात करण्यात आले आहे. त्यामुळे गणेश दर्शनासोबतच नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवांची माहिती एकाच ठिकाणी मिळत आहे.

            या उपक्रमात केवळ योजनांची माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता, योजनेसाठी पात्रता काय, अर्ज कुठे व कसा करायचा, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, संबंधित शासकीय कार्यालय कोणते आणि उपलब्ध सुविधांचा लाभ कसा घ्यायचा, याबाबत नागरिकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे शासकीय योजना आणि नागरिक यांच्यातील माहितीची दरी कमी करण्यास मदत होत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi