Tuesday, 18 August 2026

पनवेल परिसरातील उपलब्ध शासकीय जागेचा पर्यटन, शिक्षण, संशोधन आणि महसूल निर्मितीसाठी प्रभावी वापर

 पनवेल परिसरातील उपलब्ध शासकीय जागेचा पर्यटन, शिक्षण, संशोधन आणि महसूल निर्मितीसाठी प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील पर्यटनाची क्षमता लक्षात घेता या प्रकल्पामुळे राज्यातील सागरी पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्याबरोबरच संशोधनासाठीही सुविधा उपलब्ध होणार आहेत.

प्रकल्पाची संकल्पना व्यवस्थित असून पर्यटनाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला गती देऊन दिवाळीपर्यंत भूमिपूजन होईल, या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले. प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दोन आठवड्यांनंतर पुन्हा बैठक घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

या प्रकल्पाचा दर्जा आणि त्याच्या देखभालीची आवश्यकता लक्षात घेऊन भविष्यातील देखभाल व्यवस्थेचे योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या. विमानतळाच्या जवळ हा प्रकल्प असल्याने देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठीही तो उपयुक्त ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

0000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi