Tuesday, 18 August 2026

पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या

 पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या

-मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

·         सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

 

मुंबई, दि. १७ : पनवेल येथील प्रस्तावित सिल्ला मत्स्यालय आणि सी लायन मनोरंजन केंद्र या महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीस गती देऊन आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी दिले.

पनवेल येथील मत्स्य उपकेंद्रात प्रस्तावित प्रकल्पाच्या अनुषंगाने यापूर्वी झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी, प्रकल्पाचे तांत्रिक स्वरूप, प्रशासकीय बाबी तसेच पर्यटनाच्या दृष्टीने प्रकल्प विकसित करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदार विक्रांत पाटील, पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन.रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, रायगडचे जिल्हाधिकारी, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे, मत्स्य उपकेंद्र पनवेल येथील शास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्यासमोर करण्यात आले. प्रस्तावित केंद्रामध्ये सागरी व गोड्या पाण्यातील मत्स्यालय, समुद्रातील जैवविविधतेवर आधारित प्रदर्शन, ओशन टनेल, विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षण केंद्र, टच पूल, जेलीफिश, कोरल रीफ व विविध सागरी जीवांचे प्रदर्शन तसेच संशोधन व प्रजनन सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi