Monday, 17 August 2026

जलसंधारणाच्या विविध उपक्रमांची माहिती

 जलसंधारणाच्या विविध उपक्रमांची माहिती

या विशेष मुलाखतीत सचिव जितेंद्र पापळकर राज्यातील जलसंधारणाच्या कामांची सद्यस्थिती, शासनाच्या विविध योजना आणि भविष्यातील नियोजनाबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.०, माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन, लघुसिंचन प्रकल्प, सिमेंट बंधारे तसेच विविध मृदसंधारणाची कामे याबाबतही ते मार्गदर्शन करणार आहेत.

 

राज्यातील जलसंधारणाच्या कामांना अधिक परिणामकारक स्वरूप देताना पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन, पाणी अडविणे व जिरविणे, भूजल पुनर्भरण आणि भूजल पातळीत वाढ यावर विशेष भर देण्यात येत आहे. त्यासाठी गावनिहाय जलआराखडा, स्थानिक जलस्रोतांचे नियोजन आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व शाश्वत पद्धतीने वापर याबाबत जय महाराष्ट्रआणि दिलखुलासमुलाखतीत माहिती देण्यात येणार आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi