पंढरपूरच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेलाही चालना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धार्मिक स्थळांचा नियोजनबद्ध विकास झाल्यास भाविकांची संख्या वाढते आणि त्याचा थेट सकारात्मक परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे पंढरपूरच्या विकासाकडे केवळ पायाभूत सुविधांचा विषय म्हणून न पाहता भविष्यातील आर्थिक विकासाच्या दृष्टीनेही पाहणे आवश्यक आहे. पुढील अनेक दशकांचा विचार करून पंढरपूर अधिक सक्षम, सुरक्षित आणि भाविकांसाठी सुलभ बनविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. विकासाच्या प्रक्रियेत काही उणिवा राहिल्यास सूचना कराव्यात. सर्व घटकांनी परस्पर समन्वयातून काम करून पंढरपूरच्या विकासासाठी सर्वोत्तम मार्ग काढावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सर्वांना सोबत घेऊन पंढरपूरचा सर्वांगीण, सुरक्षित आणि दीर्घकालीन विकास करण्याची शासनाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अभयराजे इंचगांवकर कुलकर्णी, व्यंकटेश नारायण कुलकर्णी, वीर रामकृष्ण महाराज, मुकुंद बडवे, बैभव बडवे, गणेश लंके, डॉ. प्राजक्ता बेणारे, चैतन्य बारसोडे, दर्शन महाजन बडवे, मनोजकुमार रामकिसन राठी आणि संजय आवताडे यांनी आपली मते व्यक्त केली.
No comments:
Post a Comment