ड्रोन उद्योगासाठी मंत्रीस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई, दि. १३ : राज्यातील ड्रोन उद्योगाच्या विकासासाठी धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, उद्योजकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि त्यांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
ड्रोन क्षेत्रातील उद्योजकांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली.
राज्यातील विविध धोरणांमध्ये संशोधन व विकास, स्वदेशी घटक निर्मिती, चाचणी, पेटंट तसेच अनुदानाबाबत असलेल्या तरतुदी एकत्रित करून ड्रोन उद्योगासाठी ‘पॉलिसी ऑफ पॉलिसीज’ तयार करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्याचे ड्रोन धोरण इतर राज्यांच्या तुलनेत सक्षम असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment