Sunday, 9 August 2026

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत 'विश्वगुरू' होण्याच्या दिशेने वाटचाल करत

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत 'विश्वगुरू' होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 'ऑरेंज इकॉनॉमी' हा त्या दृष्टीकोनाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. सर्जनशील उद्योग हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून आर्थिक विकास आणि भारताच्या 'सॉफ्ट पॉवर'ला बळकटी देणारे प्रभावी माध्यम आहे. संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी संगम घडवून आणणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. "संस्कृती आत्मा देते, तर तंत्रज्ञान अभिव्यक्तीला नवे सामर्थ्य देते, असे प्रतिपादनही मंत्री शेलार यांनी केले.

            महाराष्ट्रात जागतिक दर्जाची चित्रपट निर्मिती परिसंस्था विकसित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. राज्यातील वैविध्यपूर्ण चित्रिकरण स्थळे, आधुनिक पायाभूत सुविधा आहेत. मुंबईत उभारण्यात येणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ही संस्था एक्सआर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इमर्सिव्ह तंत्रज्ञान क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असेही मंत्री शेलार म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi