Monday, 3 August 2026

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२६-२७ अंतर्गत प्रस्तावित तसेच सुरू असलेल्या विविध विकास कामांचा

 जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२६-२७ अंतर्गत प्रस्तावित तसेच सुरू असलेल्या विविध विकास कामांचा संक्षिप्त आढावा सादर करण्यात आला. संबंधित विभागांनी मंजूर कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, तसेच विकास कामांच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करून कामांना गती द्यावी, असे निर्देश मंत्री ॲड. शेलार यांनी दिले.

 

जिल्ह्यातील विकासकामांसाठी उपलब्ध निधीचा प्रभावी आणि नियोजनबद्ध वापर करण्यासोबतच नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळेल, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. मंजूर विकासकामे प्रलंबित राहणार नाहीत आणि निधीचा विनियोग वेळेत होईल, यासाठी विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi