Wednesday, 19 August 2026

खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्याठिकाणी दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती व मजबुतीकरण करावे.

 मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले की, खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्याठिकाणी दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती व मजबुतीकरण करावे. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होईल, याची दक्षता घ्यावी. गणेशोत्सव कालावधीत जिल्ह्यातील रस्त्यांवर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. त्यामुळे चाकरमान्यांना तसेच स्थानिक नागरिकांना प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी रस्त्यांची नियमित देखभाल, खड्डे बुजविणे आणि आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत. रस्त्यांच्या कामांमध्ये केवळ खड्डे बुजविण्यापुरती कार्यवाही न करता रस्त्यांचा दर्जा आणि टिकाऊपणा यावर विशेष लक्ष द्यावे. दुरुस्ती व मजबुतीकरणाची कामे दर्जेदार पद्धतीने करण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi