Wednesday, 19 August 2026

कणकवली फ्लायओव्हरची तातडीने दुरुस्ती

 कणकवली फ्लायओव्हरची तातडीने दुरुस्ती

कणकवली फ्लायओव्हरवरील रस्त्याला खड्डे पडल्याने काही ठिकाणी पाणी साचत असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी याठिकाणी तातडीने आवश्यक दुरुस्तीची कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री राणे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

 

प्रमुख रस्त्यांचे सेफ्टी ऑडिट करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांचे सेफ्टी ऑडिट करून अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करावीत. अशा ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना, दिशादर्शक फलक, रस्ता सुरक्षा साधने आणि इतर आवश्यक उपाय तातडीने करावेत, असेही निर्देश बैठकीत देण्यात आले. रस्त्यांच्या कामांची नियमित पाहणी करून कामांचा दर्जा तपासावा तसेच संबंधित विभागांनी आपापल्या अखत्यारितील रस्त्यांची स्थिती सातत्याने तपासून आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi