देशात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढत असताना डिजिटल फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. त्यामुळे ऑनलाइन बँकिंग सुरक्षित करण्यासाठी फॉरेन्सिक तंत्रज्ञानाची मदत घेणे आवश्यक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘म्यूल हंटर’सारखे उपक्रमही सुरू केले आहेत. राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठासोबत आज झालेल्या सामंजस्य करारामुळे सायबर सुरक्षा, डिजिटल फसवणूक प्रतिबंध, डिजिटल फॉरेन्सिक, बँकिंग सुरक्षेसह कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होतील. यावेळी शहरी सहकारी बँकांसाठी सुरक्षा संचालन केंद्राचीही सुरुवात करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते शहरी सहकारी बँकांसाठी सायबर सुरक्षेसंदर्भातील सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर (SOC) चे दूरस्थ पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी उप-महाव्यवस्थापक जी. पी. मिस्त्री यांनी लिहिलेल्या 'ऑपरेशनल रिस्क मॅनेजमेंट – अ प्रॅक्टिकल गाईड टू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सहकार सीबीएस प्रणालीशी यशस्वीरीत्या जोडल्या गेलेल्या प्रथम सहा शहरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात आला. राष्ट्रीय सेवा बंडलअंतर्गत 'कोर बँकिंग सर्व्हिस' आणि संबंधित सेवांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी आणि एनयूसीएफडीसी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागरी सहकारी वित्त विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता यांनी केले तर एनयूसीएफडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभात चतुर्वेदी आभार यांनी मानले.
No comments:
Post a Comment