Saturday, 8 August 2026

महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये देशातील मोठ्या प्रमाणावर शहरी सहकारी बँका कार्यरत

 महाराष्ट्रात ४४९ सहकारी बँका असून देशातील सहकारी बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये देशातील मोठ्या प्रमाणावर शहरी सहकारी बँका कार्यरत आहेत. त्यामुळे शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या अंब्रेला संस्थेचे मुख्यालय महाराष्ट्रात असणे अधिक उपयुक्त ठरेल. देशातील शहरी सहकारी बँकांना अम्ब्रेला ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. सहकारातून समृद्धीचा अर्थ केवळ बँक किंवा संस्थेची समृद्धी नसून, बँकेच्या ग्राहकाला समृद्ध करणे हा आहे. शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक, सुरक्षित, पारदर्शक आणि जागतिक स्तरावर सक्षम करण्यासाठी अम्ब्रेला ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आज महत्त्वपूर्ण सुरुवात झाली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi