Wednesday, 26 August 2026

ऐतिहासिक स्मारके व गडकिल्ल्यांच्या संवर्धनाला गती द्यानांदोस गढी येथे स्थळ संग्रहालय · भगवंतगडाचा डिजिटल सर्व्हे · सिद्धगडला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू

 ऐतिहासिक स्मारके व गडकिल्ल्यांच्या संवर्धनाला गती द्या

- मंत्री ॲड. आशिष शेलार

·         नांदोस गढी येथे स्थळ संग्रहालय

·         भगवंतगडाचा डिजिटल सर्व्हे

·         सिद्धगडला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू

 

मुंबई, दि २५ : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून (सर्वसाधारण) उपलब्ध होणाऱ्या ३ टक्के निधीच्या तरतुदीला २०२६-२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निधीतून तसेच विभागीय निधीतून सुरू असलेल्या संवर्धनाच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

 

मंत्री ॲड शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदोस गढी, भगवंतगड आणि सिद्धगड यांच्या संवर्धनाबाबत बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

 

नांदोस गढी येथे पुरातत्व स्थळ संग्रहालयउभारण्यात येणार असून, त्याचे व्यवस्थापन स्थानिक ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात येणार आहे. भगवंतगडाचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल सर्व्हे करून त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात येणार असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi