Thursday, 27 August 2026

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्राची उत्तुंग कामगिरी; ‘उमेद’ अभियानाला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

 प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्राची उत्तुंग कामगिरी;

उमेदअभियानाला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

 

नवी दिल्ली, 26 : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील (पीएमएफएमइई) 'बीज भांडवल' (Seed Capital) घटकाच्या अत्यंत प्रभावी अंमलबजावणीबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला (उमेद) राष्ट्रीय स्तरावरील ‘Best Performance State’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

नवी दिल्ली येथील 'इंडिया हॅबिटॅट सेंटर' (India Habitat Centre) येथे आयोजित विशेष पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते हा गौरवपूर्ण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्राचे कृषी मंत्री  दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा राष्ट्रीय पुरस्कार 'उमेद' अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर दुबे पाटील यांनी स्वीकारला. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी उमेद अभियानाच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi