Thursday, 27 August 2026

नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने

 नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक माहिती संकलित करण्यात येत आहे.


ठाणे जिल्ह्यातील जे नागरिक/पर्यटक सध्या नेपाळमध्ये अडकले आहेत, अथवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीची माहिती महाराष्ट्र शासनाच्या खालील “सहायता” पोर्टलवर तातडीने नोंदवावी.


महाराष्ट्र शासन – Emergency Evacuation Registration Portal :


https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/


सदर पोर्टलवर संबंधित व्यक्तीचे नाव, पासपोर्ट क्रमांक, मोबाईल/WhatsApp क्रमांक, महाराष्ट्रातील पत्ता व जिल्हा, आपत्कालीन संपर्क क्रमांक, सध्याचा देश/शहर व पत्ता, GPS Location, Visa Details, सोबत असलेल्या व्यक्तींची संख्या, जवळचे विमानतळ तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असल्यास त्याबाबतची माहिती भरता येईल.


तसेच आवश्यकता असल्यास जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्याशीही संपर्क साधावा.

 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष


ठाणे जिल्ह्यातील संबंधित नागरिक व त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून न जाता वरील पोर्टलवर अचूक व संपूर्ण माहिती तातडीने भरावी, जेणेकरून राज्य शासन व संबंधित यंत्रणांना आवश्यक समन्वय व पुढील कार्यवाही करणे सुलभ होईल.


— जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi