Saturday, 1 August 2026

‘शासन आपल्या दारी’सोबत आता समाधानही; महसूल विभागाच्या शिबिरातून नागरिकांच्या तक्रारींवर समाधानकारक कार्यवाही

  

शासन आपल्या दारीसोबत आता समाधानही; महसूल विभागाच्या शिबिरातून नागरिकांच्या तक्रारींवर समाधानकारक कार्यवाही

 

                                                             –विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

 

मुंबई, दि. 1 : महसूल विभागाच्या सेवा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानहे शासन आणि जनता यांच्यातील नाळ अधिक घट्ट करणारा उपक्रम आहे. शासन आपल्या दारीया संकल्पनेपुढे जाऊन नागरिकांच्या तक्रारी व अर्जांवर समाधानकारक कार्यवाही करण्याचे काम या शिबिराच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.

 

मुंबई शहर जिल्ह्यात दि. २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानआयोजित करण्यात आले. या अभियानातील अंतिम शिबिराचे आयोजन १८७-कुलाबा विधानसभा मतदारसंघातील रामा आणि सुंदरी वाटूमल सभागृह, के. सी. महाविद्यालय, चर्चगेट येथे करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलत होते.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi