Saturday, 1 August 2026

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 3.0 साठी गुणवत्तापूर्ण प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करा

 प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 3.0 साठी

 गुणवत्तापूर्ण प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करा


 - सचिव डॉ. जितेंद्र पापळकर

▪ नाशिक येथे राज्यस्तरीय कार्यशाळेत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन

पुणे, दि. 31 : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – पाणलोट विकास घटक (PMKSY-WDC) 3.0 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील कोणताही भाग उपचाराविना (Untreated) राहणार नाही, यासाठी वैज्ञानिक, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि गुणवत्तापूर्ण प्राथमिक प्रकल्प अहवाल (PPR) तयार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मृद व जलसंधारण विभागाचे सचिव डॉ. जितेंद्र पापळकर यांनी केले

वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, पुणे यांच्या वतीने नाशिक येथे आयोजित प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 3.0 अंतर्गत प्राथमिक प्रकल्प अहवाल (PPR) तयार करण्याबाबतच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत राज्यातील मृद व जलसंधारण विभाग तसेच जिल्हा परिषदांच्या कार्यकारी अभियंत्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi