महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर
- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
संयुक्त राष्ट्रसंघाशी शाश्वत विकास ध्येय गाठण्याचे निर्देश
मुंबई, दि. ३० : राज्यातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य, पोषण, सुरक्षित मातृत्व, बालकांचा सर्वांगीण विकास आणि महिलांचे सक्षमीकरण सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येत असून सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करून शाश्वत विकास ध्येयांची विहित कालमर्यादेत प्रभावी पूर्तता करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
महिला व बालविकास विभागामार्फत मंत्रालयात शासन विकास ध्येय संदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, सन २०३० पर्यंत संयुक्त राष्ट्र संघानी निश्चित केलेली शाश्वत विकास ध्येये (Sustainable Development Goals–SDGs) प्रभावीपणे साध्य करण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध, परिणामकारक आणि समन्वयात्मक पद्धतीने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर योजनांची फलनिष्पत्ती वाढविण्यासाठी नियमित मूल्यमापन, प्रभावी अंमलबजावणी आणि परिणामाधारित कार्यपद्धतीवर विशेष भर देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
No comments:
Post a Comment