Sunday, 12 July 2026

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करावेत

 नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करावेत

-ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर

·         एमएनआरईमेडा अंतर्गत सौर ऊर्जा उद्यानांच्या कामांना गती

·         पाटोदा सौर ऊर्जा उद्यानासह विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा

 

मुंबई, दि. १० : राज्यशासन नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्पांची प्रभावी, पारदर्शक व कालबद्ध अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास कटिबद्ध असून, सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय व तत्परतेने कार्य करून हे प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करावेत, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी दिले.

 

राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील एमएसआरडीसी कार्यालयात एमएनआरई व महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा) अंतर्गत राज्यात विकसित होत असलेल्या सौर ऊर्जा उद्यानांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

 

बैठकीस ऊर्जा विभागाचे अवर सचिव जयंत सागडे, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे संजय कुऱ्हाडे, पाटोदा सौर ऊर्जा प्रकल्पाचे यश धुमाळ, महावितरण, महापारेषण, मेडाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi