Sunday, 12 July 2026

पाटोदा सौर ऊर्जा उद्यानासह विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा

 बैठकीत पाटोदा सौर ऊर्जा उद्यानासह विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक मंजुरी, ग्रीड कनेक्टिव्हिटी तसेच मुदतवाढीच्या प्रस्तावांबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना राज्यमंत्री साकोरे - बोर्डीकर यांनी दिल्या. प्रकल्पांच्या प्रगतीनुसार मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे त्वरित सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचेही निर्देशही त्यांनी दिली.

 

प्रस्तावित सौर ऊर्जा उद्यानांच्या विकासासाठी चार हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीची क्षमता असून, या प्रकल्पांमुळे राज्याच्या हरित ऊर्जावाढीस तसेच स्थानिक रोजगारनिर्मितीस चालना मिळणार आहे. प्रकल्पांचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करून आवश्यक प्रक्रिया गतिमान कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi