Friday, 17 July 2026

कर्करुग्ण उपचारासाठी महाकेअरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा निर्माण कराव्यात

 कर्करुग्ण उपचारासाठी महाकेअरच्या माध्यमातून

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा निर्माण कराव्यात

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         महाकेअर अंतर्गत नागपूरमध्ये नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट उपकंपनी स्थापन करणार

 

मुंबई, दि. 16 : राज्यातील कर्करोग रुग्णांवर उपचारासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनी (महाकेअर)च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा निर्माण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनी संचालक मंडळाची पहिली बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आदी उपस्थित होते.

आधुनिक तंत्रज्ञान, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि राज्य-शासित एल 2 व एल 3 कर्करोग रुग्णालयांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला निदानापासून उपचारापर्यंत समान व जागतिक दर्जाची कर्करोग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाकेअर कंपनीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्या माध्यमातून राज्यातील कर्करुग्णांची संख्या कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे महाकेअरसाठी मनुष्यबळ उभारताना उच्च दर्जाची क्षमता असलेले मनुष्यबळ घ्यावे, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi