Thursday, 16 July 2026

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक

 सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक

-       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•        अमली पदार्थांच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाका

•        अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना व कृती योजनेबाबत बैठक

•        इयत्ता सातवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात अमली पदार्थ दुष्परिणामांचा समावेश करा

 

मुंबई, दि. १६ : नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या अमली पदार्थांचे उत्पादन, पुरवठा, खरेदी - विक्री व्यवहार आणि कृत्रिमरित्या तयार करण्यात येणाऱ्या अमली पदार्थांची निर्मिती, पुरवठा व्यवसायाच्या   अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्याचे निर्देश देत सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे अमली पदार्थ संदर्भातील आयोजित बैठकीत सांगितले.

शालेय जीवनापासूनच अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती आणण्यासाठी इयत्ता सातवी ते दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये अमली पदार्थ दुष्परिणाम विषयक घटकांचा समावेश करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi