वाघोशी जलसिंचन प्रकल्पासाठी उर्वरित कामांना गती द्या;
सुधारित प्रस्ताव सादर करा
- जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. १०: सातारा जिल्ह्यातील वाघोशी जलसिंचन प्रकल्पातील विविध कामांचा आढावा घेताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कालव्यांच्या अस्तरीकरणाचे व उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल या दृष्टीने सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
मंत्रालयातील परिषद सभागृहात जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांबाबत मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत याबाबत आढावा घेण्यात आला.
वाघोशी जलसिंचन प्रकल्पांतर्गत १४७ किलोमीटर लांबीच्या कालव्यांच्या अस्तरीकरणासाठी शासनाने यापूर्वीच प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यापैकी ४७ किलोमीटर कालव्यांचे काम पूर्ण झाले आहे. या प्रस्तावाला उच्चस्तरीय समितीची मान्यता यापूर्वीच प्राप्त झाली असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर फलटण तालुक्यातील अनेक गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. या कामासाठी नाबार्डच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
No comments:
Post a Comment