निरा देवघर धरणातून मंजूर असलेले पाणी वाघोशी उपसा सिंचन योजनेद्वारे कार्यान्वित करण्यात येते. हे पाणी धोम-बलकवडी कालव्यात सोडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळवून दिला जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीत निरा देवघर प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला. सुमारे २३० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाद्वारे सांगोला तालुक्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. तसेच रिठेवाडी प्रकल्पात पाण्याचा पुरेसा साठा नसल्याने तेथे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती मंत्री विखे पाटील यांनी घेतली.
No comments:
Post a Comment