एकाच मोबाईल ॲपद्वारे कार, ऑटो-रिक्षा आणि बाईक टॅक्सी सेवा उपलब्ध
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ओला आणि उबरसारख्या खासगी ॲग्रीगेटर्सनी आजवर वाहतूक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे, मात्र सण-उत्सव किंवा पावसाच्या काळात प्रचंड भाडेवाढ करून सर्वसामान्य प्रवाशांची होणारी लूट आणि चालकांवर लादले जाणारे अवाजवी कमिशन या दोन्ही गोष्टींमुळे प्रवासी व चालक दोन्ही अडचणीत येत होते. या पार्श्वभूमीवर भारत टॅक्सीच्या माध्यमातून सहकार क्षेत्राच्या ताकदीवर एक अत्यंत पारदर्शक, सुरक्षित आणि स्वस्त पर्याय उभा राहिला आहे. एकाच मोबाईल ॲपद्वारे कार, ऑटो-रिक्षा आणि बाईक टॅक्सी अशा तिन्ही प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, मध्यस्थांची साखळी मोडीत काढून थेट चालक आणि प्रवाशाला जोडणारी ही क्रांती ठरेल. पहिल्या दीड किलोमीटरसाठी केवळ 31 रुपये आणि त्यानंतर प्रति किलोमीटर 21 रुपये असा काळी-पिवळी टॅक्सीच्या धर्तीवर निश्चित केलेला सुटसुटीत दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
No comments:
Post a Comment