Monday, 6 July 2026

जामनेरमध्ये ग्रीनफिल्ड प्रकल्पासह राज्यात १,२०० कोटी गुंतवणुकीमुळे स्थानिक उद्योगांना गती मिळणार

 जामनेरमध्ये ग्रीनफिल्ड प्रकल्पासह राज्यात १,२०० कोटी गुंतवणुकीमुळे

 स्थानिक उद्योगांना गती मिळणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. ३ : हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसने जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे ग्रीनफिल्ड प्रकल्पासह राज्यात सुमारे १,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे.या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती, स्थानिक उद्योगांना चालना तसेच परिसराच्या आर्थिक विकासाला गती मिळेल असे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

विधानभवन येथे जामनेर जिल्हा जळगाव येथील कोकाकोला प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी. अनबळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत रुपाणी, हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस उपाध्यक्ष हिमांशू प्रियदर्शी, हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस चे मुख्य एकात्मिक पुरवठा साखळी अधिकारी अविनाश कांत कुमार यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi